Manoree

संत चोखोबा म Sant Chokhoba M

Posted in संत चोखोबा म Sant Chokhoba M by skmrunal4u on October 18, 2021

सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे – 2
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे
वाचे आळवावे – 2 , विठोबासि
वाचे आळवावे , विठोबासि ।। धृ ।।
सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे

संसार सुखाचा , होईल निर्धार – 2
नामाचा गजर – 2, सर्वकाळ ।।१।।
सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे

काम क्रोधाचे , न चलेचि काsssही
काम क्रोधाचे , नsचलेचि काsssही
आशा मनीषा पाही – 2(n),दूर होती ।।२।।
सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे

आवडी धरोनि, वाचे म्हणे हरी हरी (n)
आवडी धरोनि, ^वाचे म्हणे sss, हरी हरी
आवडी धरोनि – 2
आवडी धरोनि, वाचे म्हणे हरी हरी (n)
हरी हरी , हरी हरी , हरी हरी , हरी हरी – 2
आवडी धरोनि, वाचे म्हणे हरी हरी (n)
^म्हणतसे हरी – 2, चोखियासी – 2
सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे
वाचे आळवावे – 2 , विठोबासि
सुखाचे हे नाम , आवडीने घ्यावे
सुखाचे हे नाम , आवडीने ध्यावे
सुखाचे हे नाम , आsssवडीने गावे
सुखाचे हे नाम -3
आवडीने गावे – 3
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (slow speed) – 2
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (medium speed) – 2
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (fast speed) – 2
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग – 2

 

गजर

Posted in बाप्पा मोरया Bappaa Morayaa by skmrunal4u on September 19, 2021

 

मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया 

 

 

 

 

 

 

मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया                           २
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया ।। धृ ।।        २

तू विश्वाचा पालनकर्ता , वक्रतुण्ड तू मोरया २
तू सकलांचा प्रेमपिता तू , गौरीनंदा तू मोरया ।।१।।    २

तू पीडितांचा दुःखीजनांचा , दुःखहर्ता तू मोरया        २
तू सर्वांचा भक्तजनांचा , सुखकर्ता तू मोरया ।।२।।    २

सुखशांतीचा सुखकारी तू , जगत् पिता तू मोरया      २
प्रेमभावाचा, दया शांतीचा ,  प्रेमदाता तू मोरया ।।३।।     २

दिनदयाळू तू प्रेमाळु , कृपावंत तू मोरया २
दया सागरा तू च ईश्वरा , दयावंत तू मोरया ।।४।।   २

या जीवनांचा संसारांचा 2 मंगलबिंदू मोरया 
या जीवनांचा संसारांचा , मंगलबिंदू मोरया 
या विश्वाचा सत्ताधारी तू ,जगत् गुरु तू मोरया ।।५।।   २

 

संत माणिक प्रभु महाराज Sant Maanik Prabhu Mahaaraaja

Posted in संत माणिक प्रभु म Sant Maanika Prabhu M by skmrunal4u on September 6, 2021

रचना – संत माणिक प्रभु महाराज

 

गणराज पायी मन जड जड जड

मन हे भज भज भज शिव

 

 

 

गणराज पायी मन जड जड जड ।
एकदंत गजवदन विराजित ।
मोदक भक्षिसी भड भड भड ।। धृ ।।
वेड भुजांगी शेंदुर चर्चित ।
फरशांकुश करी खड खड खड ।। १ ।।
पीतांबर जरी वरी फणिवेष्टित ।
मूषक चालवि दड दड दड ।। २ ।।
माणिक म्हणे मतिमंद मुक्यासि ।
वाचे बोलवि घड घड घड ।। ३ ।।

_*_*_*_*_*_*_*_

मन हे भज भज भज शिव , सांब सांब सांब सांब – २ ।।धृ

चंद्रभाल कण्ठनिल – २
डमरू करी धरी त्रिशूल – २
शोभत गळा रुंड माळ – २
वरी तो जगदंब दंब – २ ।।१
मन हे भज भज भज शिव , सांब सांब सांब सांब – २

जटा गंग भस्म अंग , कुंडल कानी शोभे भुजंग – २
सन्मुख उभे शृंग भृंग – २
वाजवी शंख भूम्ब भूम्ब – २ ।।२
मन हे भज भज भज शिव , सांब सांब सांब सांब – २

गोवाहन नेत्र तीन , दशकर जो पंचवदन – २
माणिक मना जाय शरण – २
टाकुनिया दंभ दंभ – २ ।।३
मन हे भज भज भज शिव , सांब सांब सांब सांब – २

_*_*_*_*_*_*_*_

 

 

संत ज्ञानेश्वर महाराज Sant Dnyaneshwar Mahaaraaja

Posted in संत ज्ञानेश्वर म Sant Dnyaneshwar M by skmrunal4u on August 13, 2021

सद्गुरुसारिखा असता पाठीराखा २
इतरांचा लेखा कोण करी
सद्गुरुसारिखा असता पाठीराखा – २

राजयांचि कांता काय भीक मागे – २
मनाचिया जोगे – २ , सिद्धी पावे
सद्गुरुसारिखा असता पाठीराखा – २

कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला – २
काय उणे त्याला – २ , सांगा जो जी
सद्गुरुसारिखा असता पाठीराखा – २

ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
ज्ञानदेव म्हणे – २
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
तरलो तरलो – २
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
आता उध्दरलो – २ गुरुकृपे
सद्गुरुसारिखा असता पाठीराखा
इतरांचा लेखा कोण करी
सद्गुरुसारिखा असता पाठीराखा – ३

-*-*-*-*-*-*-*-

 

अंबा माता भवानी भक्ती गीते Ambaa Bhavaanee Bhaktee Geete Devotional songs

Posted in अंबा माता भवानी Ambaa Bhavaanee by skmrunal4u on August 9, 2021

 

जय जय जय अंबे भवानी – ३
तिन्ही जगाची तूच स्वामिनी २
जय जय जय अंबे भवानी – २ ।। धृ

पाठ तुझा जो,  करी संसारी , संकट त्याचे , तूच निवारी – २
होऊनि जगत् जननी , भवानी – २ ।। १
जय जय जय अंबे भवानी – २

आदिशक्ती तू आदिमाया , वंदिती सुरवर तुझिया पाया – २
महिषासुर मर्दिनी भवानी – २ ।। २
जय जय जय अंबे भवानी – २

भक्तालागी तू , धावत येसी , तारुनि त्यांना पावन करिसी – २
म्हणविसी वरदायिनी भवानी – २ ।। ३
जय जय जय अंबे भवानी – २

भक्त म्हणे तुज दुर्गे माते  – २ , आलो शरण मी चरणी तू तें – २
सुंदर शिवरमणी , भवानी – २
जय जय जय अंबे भवानी – ३
तिन्ही जगाची तूच स्वामिनी २
जय जय जय अंबे भवानी – ३

-*-*-*-*-*-*-*-

अंबाबाईचा उदो उदो २

अंबाबाईचा ३ छंद मनाला ~~~ (u) , अंबाबाईचा छंद मनाला ~~~ (n)
अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (u) , अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (n)
अंबाबाईचा छंद मनाला ssss , अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (n )

गुण गाईन मी , रूप पाहीन मी  २
किती वाटेल ३ , धन्य मनाला ~~~ (u) , किती वाटेल धन्य मनाला ~~~ (n)
किती वाटेल धन्य मनाला ~~~ (n) , अंबाबाईचा छंद मनाला ssss
अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (n )

तव ध्यास असे या जीवा –> , तव ध्यास असे या जीवा ~~~ (u)
तव ध्यास असे या जीवा ~ , तव ध्यास असे या जीवा (n)
सहवास तुझा मज व्हावा (u) ,सहवास तुझा मज व्हावा (n)
विनती ही असे चरणाला (u) २ , अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (n)
अंबाबाईचा छंद मनाला ssss , अंबाबाईचा छंद मनाला  ~~~ (n )
अंबा माता की जय

 

-*-*-*-*-*-*-*-

 

संत नामदेव महाराज Sant Namdev Mahaaraaja

Posted in संत नामदेव म Sant Namdev M by skmrunal4u on August 7, 2021

संत नामदेव महाराज

 

माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २
केशवा माधवा नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा – २
ना करी अव्हेरा पांडुरंगा – २ , पांडुरंगा
केशवा माधवा नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २

अनाथांच्या नाथा होशी तू दयाळा – २
किती वेळोवेळां – २ , प्रार्थु आता
केशवा माधवा नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २

नामा म्हणे जीव होतो कासावीस – २
केली तुझी आस – २ , आता बरी
माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २
केशवा माधवा नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा – २

 

 

संत सावतामाळी महाराज Sant SaawataaMaalee Mahaaraaja

Posted in संत सावतामाळी म Sant SaawataaMaalee M by skmrunal4u on August 7, 2021

संत सावतामाळी महाराज

 

 

कांदा मुळा भाजी हो … कांदा मुळा भाजी …
अवघी विठाबाई माझी – २
लसूण मिरची कोथिंबिरी – २
अवघा झाला माझा हरी – २
कांदा मुळा भाजी हो कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी – २

ऊस गाजर रताळू – २
अवघा झाला असे गोपाळू – ३
मोट नाडा विहीर दोरी – २
अवघी व्यापिली पंढरी – ३
सावता म्हणे केला मळा हो …
सावता म्हणे केला मळा
केला मळा – २
विठ्ठल पायी गोवीला गळा – ४
कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी – २
कांदा मुळा भाजी हो … कांदा मुळा भाजी …